नाशिक रोड| प्रतिनिधी|नाशिक, मनमाड, इगतपुरी या महत्वाच्या स्थानकांचा समावेश असलेल्या भुसावळ विभागाला ऑक्टोबर महिन्यात १२१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.भुसावळ या वित्तीय वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात प्रवासी वाहतूकीतून ६३ कोटी रुपये, अन्य कोचिंगमधून ६.५५ कोटी, माल वाहतुकीतून ५१.३९ कोटी, अन्य स्त्रोतातून २.३९ कोटी मिळाले. तिकीट तपासणीने महत्त्वाचे योगदान दिले आहे. तिकीट तपासणीच्या ५४ हजार प्रकरणांमधून ३ कोटी १६ लाखांचा महसूल मिळाला.
ऑक्टोबर २४ मध्ये ऑटोमोबाईलच्या ४९ मालगाड्यांमधून (रेक्स) वाहने देशभरात पाठिवण्यात आल्या. त्यातून ६.२० कोटीचा महसूल मिळाला. या ४९ रेक्सपैकी नाशिकमधून २५ आणि देवळालीतून २४ रेक पाठविण्यात आले. ऑक्टोबरमध्ये प्रवाशांसाठी मनमाड स्थानकावर बॅटरी कार सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधांमुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला आणि रुग्णांची सोय झाली आहे. प्रवाशाची गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊनच प्रवास करावा असे आवाहन रेल्वेने केले आहे.