नाशिक| दिअँकर वृत्तसेवा| जिल्ह्यातील १५ मतदार संघासाठी बुधवारी सकाळी मतदान होईल. जास्तीत जास्त मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे, यासाठी शासकीय पातळीवर जनजागृती मोहीम राबवली जात आहे. त्यात आता खाजगी व्यावसायिक ही मागे नाही. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा म्हणून अनेकांनी पुढाकार घेतला असून या अनुषंगाने मतदारांसाठी येथील राजापुरकर सराफ यांच्यातर्फे विशेष ऑफर ठेवण्यात आली आहे.
आपलाच पिढ्यान पिढ्याचा सोनार म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजापूरकर सराफतर्फे मतदान करा व सोने दागिने मजुरीवर २५ टक्के सूट मिळावा, असे जाहीर करण्यात आले. अधिक माहितीसाठी राजापुरकर सराफ यांच्या सिद्धी संकुल, चांदी गणपती मंदिरामागे, नवीन सराफ बाजार गायधनी गल्ली रविवार कारंजा नाशिक येथे संपर्क साधण्याचे आवाहन संचालक चेतन राजापुरकर केले आहे.