- बाप नव्हे, काकाच पूर्ण करणार; जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर - TheAnchor

Breaking

November 10, 2024

बाप नव्हे, काकाच पूर्ण करणार; जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर

नाशिक| राज्याचे उपमुख्यमंत्री सांगलीत गेले म्हणाले, यांनी जेवढ्या घोषणा केल्या त्या यांच्या बापकडून ही पूर्ण होणार नाही, अरे बापाचा विषय नाही या घोषणा तुझा काकाच पूर्ण करणार तुम्ही चिंता करू नका असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले.


नाशिक येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मखमलाबाद येथे जाहीरसभा झाली. विरोधकांचा समाचार घेतांना ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते पंडित पिंगळे, श्रीराम शेटे, खा. भास्कर भगरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरूषोत्तम कडलग, अजय बागुल, गोकुळ पिंगळे, गणेश गिते आदी उपस्थित होते.


लोकसभा निवडणूक झाली, महायुती घाबरली दिसेल त्याला घेतले, सरकार जाणार म्हणून ५० ते ३० हजार कोटींचे निर्णय घेतले. जाहिरात देऊन कामे केल्याचा बनाव केल्याचा आरोप पाटील यांनी केला. लोकसभेत आधी बहिणीला त्रास दिला, पाडायचा प्रयत्न केला, पाडण्यासाठी टोकाच्या भाषेचा वापर केला. आता लोकसभा निवडणुकीनंतर सर्व बहिणी लाडक्या झाल्या. महाराष्ट्रातील बहिणी एवढ्या येड्या नाहीत, त्यांना सगळे कळते आम्ही कशामुळे लाडक्या झालो आहे. हे सावत्र भाऊ आहे याची जाणीव झाली. सध्या राज्य त्यांचे आहे म्हणून तुम्ही गप्प आहात म्हणून आपण सख्या भावाचे राज्यात सरकार आणाल असा विश्वास ही पाटील यांनी व्यक्त केला.


महागाईने उच्चांक गाठला आहे. पाचशेवरून दिवाळी खर्च २० हजारावर पोहचला आहे. त्यातही २० हजारात ७० टक्केच दिवाळी साजरी करावी लागते. सगळ्या वस्तू महाग झाल्या. महायुतीच्या काळात महागाई डबल झाल्याची टीका त्यांनी केली. राज्यात बेरोजगारी वाढत आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गुजरातमध्ये गेले. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चकार शब्द ही काढला नाही. १७ उद्योग महाराष्ट्रातून गुजरातेत गेले, फॉक्सकॉन त्यापाठोपाठ टाटा - एअरबसच्या प्रकल्पाचे उद्घाटन होऊन प्रकल्प उभारला गेला, पाच-पंधरा हजार नोकऱ्या उपलब्ध होऊन वीस-पंचवीस हजार कोटींची गुंतवणूक गुजरातला गेली, मी मुख्यमंत्र्यांना विचारले सगळे तिकडे चालेल आहे. मुख्यमंत्री म्हणाले मोदींना सांगून यापेक्षा ही मोठा प्रकल्प देतो. मात्र मुख्यमंत्र्यांची मुदत संपली आता लक्षात आले की भोपळा मिळणार आहे. एक ही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही. मोदी -शाह यांनी सर्व प्रकल्प गुजरातला पळवून महाराष्ट्राला अधोगतीकडे नेल्याचा आरोप केला. महिंद्राचा प्रकल्प जाणार होता आम्ही पत्रक काढायला लावून तो बाहेर जाण्यापासून रोखला. हिंजवडी आयटी इंडस्ट्री राज्याबाहेर नेण्याचा घाट घातला. उद्योग यावेत रोजगार वाढावे याकडे याचे लक्ष नसल्याचे त्यांनी सांगितले.


महाराष्ट्र आणि गुजरात याची तुलना करायची झाली तर मी अर्थमंत्री असताना दरडोई उत्पंनात महाराष्ट्र गुजरातच्या वरती होता. गुजरात दरडोई उत्पन्नात खाली म्हणजे मागे होता. महाराष्ट्रात दिल्लीत मोदी फडणवीस याचे सरकार आले आणि दोन वर्षात महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात खाली आला, गुजरात ५ व्या आणि महाराष्ट्र्र ६ व्या क्रमांकावर घसरला असा गंभीर आरोप पाटील यांनी केला. दरडोई उत्पन्न वाढीने गुजरातची माणसे श्रीमंत झाली तर महाराष्ट्रातील माणसे उत्पन्नात कमी पडली. राज्याच्या स्थापनेपासून आम्ही कधी खाली गेलो नाही, महाराष्ट्राला खाली नेत दिवाळी खोरीकडे नेण्याचे पाप महायुतीने केले. भारतातील सकल उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा हा पंधरा ते साधे पंधरा टक्के होता. आता तो घसरून १३ टक्क्यांवर गेला २ टक्क्यांनी ते कमी झाले.


डबल इंजिन सरकारच्या काळात महागाई वाढली. मोटार सायकलवर २८ टक्के जीएसटी लावला. श्रीमंतांच्या हेलिकॉप्टरवर खरेदीवर केवळ ५ टक्के जीएसटी लावला जात असल्याचे त्यांनी सांगितले. गरिबांवर २४ ते २८ टक्के कर आणि श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी कर कमी करणारे सरकार असून हे सरकार आता जायला हवे, यांच्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान होत आहे.


जयंत पाटील यांच्या भाषणातील ठळक मुद्दे


*आया- बहिणी सुरक्षित नाही, बदलापूर सारख्या घटना घडत आहे. या घटनेत शाळा मालकाला वाचवण्याचे प्रयत्न याच्या सरकारने केले. भाजपा आमदार गणपत गायकवाड याने पोलिस ठाण्यात जाऊन गोळीबार केला. तो जेलमध्ये गेल्यावर त्याच्या पत्नीला यांनी उमेदवारी दिली.


* मोदींनी ७० हजार कोटीचा घोटाळा काढला. आमची सर्व टोळी तिकडे गेली, कोणी ही थांबले तयार नाही. मला ही म्हणाले चला इथे काही खरे नाही. मात्र मी शरद पवार साहेबांसोबत राहणार अशी भूमिका घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्राला संपत्ती, पैसा यापेक्षा निष्ठा, प्रामाणिक पणा महाराष्ट्राला आजही अभिप्रेत आहे.


*भाजपा साधन सुचीतेचा पक्ष आहे. ज्यांनी ७० हजार कोटींचा आरोप केला. आर आर पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशी लावल्यावर फाईल त्यांच्याकडे आली. त्यांनी सही केली. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी सही केली नाही. त्यानंतर नवीन सरकार आल्यावर मुख्यमंत्र्यांनी सही केली. आणि अजित पवार यांना बोलावून आर आर पाटील यांनी सही केल्याचे दाखवले पण त्यावर तुमची ही सही होती त्याचे काय असा प्रश्न उपस्थित करुन अजित पवार यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले.

*भाजपाच्या अनेक गोष्टी बाहेर काढल्याने नवाब मलिक यांना जेलमध्ये पाठवले. त्यांच्यावर दाऊदशी संगनमत केल्याचा आरोप करत देहाद्रोहाचा गुन्हा दाखल केला. आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या मलिकाना अजित पवार यांनी उमेदवारी दिली. एकावर एक फ्री म्हणून त्यांच्या मुलीला ही उमेदवारी दिली. आता हे सर्व भाजपाला मान्य आहे का? असा सवाल त्यांनी केला.


आमचे सरकार आले की या घोषणा आम्ही पूर्ण करणार


*महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणणार त्यात त्यांना ३ हजार रुपये आमचे सरकार देणार


*सर्व महिलांना एसटी प्रवास मोफत देणार


*यापूर्वी आमच्या सरकारने शेतकऱ्यांचे २ लाख कर्ज माफ केले. शेतकऱ्यांना यापुढे ही मदत करणार


*सर्व कुटुंबाला २५ लाखांचा विमा देणार

*१० ताखेला आमचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे असे त्यांनी सांगितले.