नाशिक रोड| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे मुंबई ते नागपूर दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे.
नागपूर ते मुंबई विशेष गाड्यांचा तपशील- गाडी क्र. ०१२६२ ही ४ डिसेंबरला नागपुरहून २३.५५ वाजता सुटेल आणि मुंबई सीएसटी येथे दुस-या दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०१२६४ ही ५ डिसेंबरला नागपूरहून ०८ वाजता सुटेल आणि मुंबईला त्याच दिवशी २३.२० वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०१२६६ ही ५ डिसेंबरला नागपुरहून १५.५० वाजता सुटेल आणि मुंबईला दुस-या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल. थांबे अजनी, सेवाग्राम, वर्धा, अकोला, जलंब, मलकापुर, भुसावळ, जळगांव, चाळीसगांव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण, दादर. संरचना: सामान्य व्दितीय श्रेणीचे १६ डबे.
अतिरिक्त नागपूर ते मुंबई एकेरी विशेष-
गाडी क्र. ०२०४० ही ७ डिसेंबरला नागपुरहून १३.२० वाजता सुटेल आणि मुंबईला दुस-या दिवशी ४.१० वाजता पोहोचेल. थांबे - अजनी, वर्धा, बडनेरा, अकोला, शेगांव, मलकापुर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि दादर. संरचना: सामान्य व्दितीय श्रेणीचे १६ डबे.
मुंबई ते नागपूर विशेष गाड्या- गाडी क्र. ०१२४९ ही ६ डिसेंबरला मुंबईहून १६.४५ वाजता सुटेल आणि नागपूरला दुस-या दिवशी १०.०५ वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०१२५१ ही ६ डिसेंबरला मुंबईहून १८.३५ वाजता सुटेल आणि नागपूरला दुस-या दिवशी १२.१० वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०१२५३ ही ७ डिसेंबरला दादरहून ००.४० वाजता सुटेल आणि नागपूरला त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०१२५५ ही ७ डिसेंबरला मुंबईहून १२.३५ वाजता सुटेल आणि नागपूरला दुस-या दिवशी ०३.०० वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०१२५७ ही ८ डिसेंबरला मुंबईहून १८.३५ वाजता सुटेल आणि नागपूरला दुस-या दिवशी १२.१० वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०१२५९ ही ८ डिसेंबरला दादरहून ००.४० वाजता सुटेल आणि नागपूरला त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल.
थांबे- दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगांव, जळगाव, भुसावळ, अको ला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव, पुलगांव, वर्धा, सेवाग्राम. संरचना : सामान्य व्दितीय श्रेणीचे १६ डबे.