- मायबाप जनतेच्या सेवेसाठी राजकारणात: खा. सुप्रिया सुळे यांचा अजितदादांवर पलटवार - TheAnchor

Breaking

November 14, 2024

मायबाप जनतेच्या सेवेसाठी राजकारणात: खा. सुप्रिया सुळे यांचा अजितदादांवर पलटवार

नाशिक| दिअँकर वृत्तसेवा| ते त्यांचे मत आहे. लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे. ही निवडणूक आमच्या कुटुंबासाठी नाही लढत, ही वैचारिक लढाई आहे. महाराष्ट्रातील अन्याया विरोधात, मायबाप जनतेसाठी, याभागातील शेतकऱ्यांच्या हमी भावासाठी, महिलांसाठी, महागाई, भ्रष्टाचाराविरोधात ही लढाई आहे. आम्ही घराण्यासाठी राजकारणात आलो नाही. या राज्यातील मायबाप जनतेच्या सेवेसाठी आलो आहे,असे खा. सुप्रिया सुळे अजितदादांवर पलटवार केला. 


नाशिक येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ खा. सुप्रियाताई सुळे नाशिक दौऱ्यावर होत्या. पत्रकारांशी संवाद साधतांना अजितदादा पवार यांनी पवार घराण्यातील कटूता कमी होईल असे वाटत नाही, असे स्टेटमेंट दिले होते, त्यावर पलटवार करतांना त्याबोलत होत्या.


उद्योगपती अडाणी यांच्याविषयी अजित दादांच्या युटर्न बाबत पत्रकारांनी प्रश्न केला असता. त्यांनी सांगितले, हा प्रश्न अजित पवारांना विचारा मी पहिल्याच दिवशी सांगितले होते. त्यांनीच स्टेटमेंट दिले. त्यांनी युटर्न घेतला. दोन्ही प्रश्न त्यांनाच विचारा असे सांगून अधिक काही बोलण्यास नकार दिला.

साहेब पहिले म्हणायचे सुप्रियाकडे लक्ष दया आता नातवाकडे लक्ष द्या म्हणतात, मी मुलासारखा असून ही लक्ष देत नाही या अजित पवारांच्या प्रतिक्रियेविषयी विचारले असता त्यांनी चार चार वेळेस उपमुख्यमंत्री कोणाला केले, मला, रोहितला की युगेंद्रला असा सवाल करुन प्रतिटोला लगावला.

बटेंगे तो कटेंगे या भाजपाच्या घोषणेवर अजितदादांपाठोपाठ भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांनीही आक्षेप घेतल्याचे पत्रकारांनी लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या, भाजपात दोन विचार झाले. एकीकडे देवभाऊ एक म्हणतात दुसरीकडे मित्रपक्ष व पंकजाताई एक याचा अर्थ भाजपाचे दोन वैचारिक भाग झाले. आधी दोन पक्ष फोडून पास झालेले देवाभाऊ यांना विचारा तुमच्या पक्षाचे विचाराचे दोन भाग झाले. विचारांचे असे हाल झाले तर सरकार कसे चालवणार अशी टीका खा. सुळे यांनी केली.