नाशिक| दिअँकर वृत्तसेवा| भाजपा महायुतीसोबत जाण्याचा निर्णय कोणा एकाचा नाही तो आम्ही सर्वांनी मिळून घेतलेला निर्णय आहे. आम्ही विकासासाठी हा निर्णय घेतला. पण शाहू- फुले-आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही. काल,आज आणि उद्याही त्यावर आम्ही ठाम राहू असा पुनर्रउच्चार उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी येथे केला.
दिंडोरी पेठ मतदार संघाचे उमेदवार विधान परिषदेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. अजित पवार पुढे म्हणाले की, लखामापूरला कार्यक्रम घेऊन मोठा निधी उपलब्ध करून दिला. दिंडोरी पेठ मतदार संघातील वळण बंधाऱ्या सहित जे कामे आहेत त्याच्या विकासासाठी निधी दिला. या आधी मिळाला नसेल इतका ३ हजार कोटी रुपये एवढा ऐतिहासिक निधी दिला. दिंडोरी पेठच्या विकासाला अग्रक्रम दिला.
भाजपा महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय एकट्या झिरवाळ यांचा नाही, तो सर्व नेत्यांचा होता, त्यात जयंत पाटील आणि राजेश टोपे यांचा ही होता असा स्पष्ट करुन पहिले अडीच वर्ष शिवसेनेसोबत जाणार मह त्यांची विचारधारा ही वेगळी होती, शिवसेना काँग्रसची देखील विचारधारा वेगळी होती मग भाजपा सोबत गेलो तर काय झाले. असे सांगून आम्ही विकासासाठी भाजपा महायुती सोबत गेले. पण असे असले तरी आम्ही शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांवर ठाम असल्याचे पवार म्हणाले.