- महापरिनिर्वाण दिनासाठी अमरावती- मुंबई अनारक्षित गाडी - TheAnchor

Breaking

December 4, 2024

महापरिनिर्वाण दिनासाठी अमरावती- मुंबई अनारक्षित गाडी

नाशिक| प्रतिनिधी| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईला जाणा-या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे अमरावती-मुंबई अनारक्षित विशेष गाडी  चालविणार आहे. ही विशेष गाडी (क्र. ०१२१८) ५ डिसेंबरला अमरावती येथून १७.४५ वाजता सुटेल आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुस-या दिवशी ०५. २५ वाजता  पोहोचेल. 


मुंबई-अमरावती विशेष गाडी (१२१७) ७ डिसेंबरला मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००:४०  वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी १२.५०  वाजता पोहोचेल. बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर, मुंबई येथे ती थांबेल. गाडीला १४ सामान्य व्दितीय श्रेणीचे डबे आहेत. रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने या आधीच मुंबई-नागपूर विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचे जाहीर केले आहे.