नाशिक रोड|शास्त्रज्ञ डॉ. अलन किबर यांच्या संशोधनातून शस्त्रक्रिया न करता हृदयाच्या झडपा रोपण करण्याच्या नवीन संशोधनामुळे अनेक रुग्णांना फायदा झाला आहे. आता ही सुविधा नाशिक येथेही उपलब्ध आहे असल्याने रुग्णांना मुंबई, पुण्याला जाण्याची गरज नाही, असे प्रतिपादन हृदयरोग तज्ञ डॉ. चिन्मय कुलकर्णी यांनी केले.
नाशिक रोड येथे मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे निरंतर शैक्षणिक
कार्यशाळा झाली. त्या प्रसंगी हृदयरोगातील झडपांशी संबंधित उपचारांविषयी ते बोलत होते. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रकाश पुंड, निमाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा वाघ, सचिव डॉ. संगीत लोंढे यांच्याहस्ते धन्वंतरी पूजन झाले. डॉ. अनघा चव्हाण, डॉ. सुनयना भुजबळ, डॉ. समीर लासुरे, डॉ. अशोक निरगुडे, डॉ. दिनकर लोहट, डॉ. लियाकत नामोले, डॉ. संतोष धात्रक, डॉ. सुरेश आहेर, डॉ. वंदना आहेर, डॉ. कुलकर्णी, डॉ. उत्तमकुमार जोशी, डॉ. उमेश नगरकर, डॉ. योगेश घोटेकर, डॉ. पद्माकर पाटील, डॉ. महेंद्र गाडेकर, डॉ. सुनील पाटील, नियोबिट फार्माचे राहुल वाजे, उदय भदाणे, भूषण शेवाळे आदी उपस्थिते होते. डॉ. आसिफ तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले.