नाशिक|सातपूर येथील बबनराव काळूजी निगळ यांचं वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, मुलगा, मुली, नातवंडे असा परिवार आहे. ह.भ.प. निवृती महाराज कापसे यांचे ते सासरे होते. त्यांचा दशक्रिया विधी शनिवार दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८:३० वाजता येथील पपया नर्सरीजवळील सौभाग्य लॉन्स येथे होणार आहे, असे समस्त निगळ परिवार, सातपूर, नाशिक यांनी कळविले आहे.
तसेच दि.१३ डिसेंबरपासून ह.भ.प. आण्णासाहेब महाराज आहेर (हिसवळकर) याचे रोज दुपारी २ ते ३ वा. गरुड पुराण व दशक्रिया विधीच्या दिवशी प्रवचन होईल असे सांगण्यात आले आहे.