नाशिक| मनपाचे मुकणे धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमण्ड सबस्टेशन गोंदे येथे विविध दुरुस्तीची कामे करण्यात येणार असून कंपनीकडून शनिवार दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ५ दरम्यान शट डाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे मनपाचे मुकणे डॅम रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथून विल्होळी जलशुध्दीकरण केंद्राला होणारा रॉ वॉटरचा पुरवठा या कालावधीत बंद राहणार आहे. त्यामुळे शहरातील नवीन नाशिक, नाशिक पूर्व व नाशिकरोड भागात सकाळी ९ ते ५ या कालावधीत पाणी पुरवठा बंद राहणार आहे, असे मनपाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मनपाचे मुकणे धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथे
महावितरण कंपनीकडील रेमण्ड सबस्टेशन गोंदे येथे एक्सप्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी 33 के.व्ही. वीजपुरवठा कार्यान्वित आहे. महावितरण कंपनीच्या रेमण्ड सबस्टेशन येथे दिवसभर दुरूस्तीचे काम होणार आहे. त्यामुळे शनिवार दिनांक दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी ०९.०० ते ०५.०० दरम्यान विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र येथून खालील भागात होणारा पाणीपुरवठा बंद राहील, याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन मनपा अधीक्षक अभियत्यांनी केले आहे.
नविन नाशिक विभागातील
प्र.क्र.२२ भागश: प्र.क्र.२४ भागश: प्र.क्र.२५ भागश: प्र.क्र.२६ भागश: प्र.क्र.२७ भागश: प्र.क्र.२८ भागश:, प्र.क्र.२९ भागश: प्र.क्र.३१ भागश: पाणी पुरवठा होणार नाही.
नाशिक रोड,
प्रभाग क्र. २२ मधील वडनेर गेट, पंपीग पर्यंत, व रेंज रोड या परिसरात पाणी पुरवठा होणार नाही.
नाशिक पुर्व विभाग
नाशिक पुर्व विभागातील प्रभाग क्र. १४ भागश:, प्र.क्र. २३ भागशः, प्र.क्र. ३० भागश
सोर्स: पीआरओ कार्यालय.