- ईव्हीएम हद्दपार करा, बॅलेट पेपरवर मतदान घ्या! या मागणीसाठी महानुभाव परिषद-वारकरी पंथाचा मोर्चा - TheAnchor

Breaking

December 13, 2024

ईव्हीएम हद्दपार करा, बॅलेट पेपरवर मतदान घ्या! या मागणीसाठी महानुभाव परिषद-वारकरी पंथाचा मोर्चा

नाशिक| दिअँकर वृत्तसेवा|ईव्हीएम मशीन हद्दपार करून बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे या मागणीसाठी शुक्रवारी अखिल भारतीय महानुभव परिषद आणि अखिल भारतीय वारकरी पंथ यांच्यातर्फे गोल्फ क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. 

त्यानंतर महंत श्रीकृष्ण राजबाबा मराठे आणि ह भ प जनार्दन बळीराम कांदे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले."मत आमचा अधिकार आहे, तर त्याचा हिशोब मागने हा सुद्धा आमचा अधिकार आहे.." "इव्हीएम मशीन हटवा, लोकशाही वाचवा.."  "ईव्हीएम मशीन हटाव".. "बॅलेट पेपर लाओ, लोकतंत्र बचाव".. अशा वेगवेगळ्या नावाचे फलक हातात घेऊन बहुसंख्य नागरिकांनी मोर्चामध्ये सहभागी झाले. 

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल बघता सामान्य जनतेच्या ईव्हीएम वरील विश्वास आता पूर्णपणे उडाला आहे. सर्वच निकाल हे संशयास्पद असून राज्यांमध्ये एक प्रकारे जो आनंदाचे वातावरण होते. ते वातावरण आता दिसून येत नाहीये राज्यात, देशांमध्ये लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर बॅलेट पेपर वरतीच निवडणूक घेतली पाहिजे असे मत नाशिक जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत श्री कृष्णराज बाबा मराठे यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी बोलताना अखिल भारतीय वारकरी पंथाचे राज्य कमिटी सदस्य ह.भ.प. जनार्दन बळीराम कांदे यांनी सांगितले की, या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आले.



बहुजन आघाडीच्या वतीने ईव्हीएम हटवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाशिकरोड येथील पूर्णकृती पुतळाजवळ ईव्हीएम मशीन हटवा लोकशाही वाचवा, स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

नागरिकांनी ई.व्हि.एम हटवण्यासाठी स्वाक्षरी केल्या  आणि बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा युवक अध्यक्ष दामोदर पगारे हे होते. सुरूवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वाक्षरी मोहीम ठिकाणी बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी- अरुण शेजवळ, चावदास भालेराव, प्रविण बागुल, विश्वनाथ भालेराव, सुहास पवार, पंडित नेटावटे, दीपक भंडारी, बाळासाहेब घायवटे, उर्मिला गायकवाड, सविता पवार, नीतू सोनकांबळे, सुरेखा बर्वे, रोहिणी जाधव, बाळासाहेब जाधव, जयभीम पाईक सम्राट फुले, जितेंद्र श्रीवंत, विष्णू दोंदे, विजय दोंदे, युवराज बर्वे, रोहिदास साळवे, आकाश गायकवाड, दिनेश पुजारी, अनिल खैरनार, निलेश कटारे, संतोष सोनवणे, आदींसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.