- नाशिक 'रन' मध्ये धावले हजारो नाशिककर - TheAnchor

Breaking

January 13, 2025

नाशिक 'रन' मध्ये धावले हजारो नाशिककर

नाशिक| समाजातील गरजूंसाठी २३ व्या नाशिक रन मध्ये  शनिवारीच्या गुलाबी थंडीत हिरवे टी-शर्ट परिधान करून  हजारो नाशिककर धावले. तसेच समाजसेवी उपक्रमास स्वयंस्फूर्तीने हातभार लावला. यात पाच हजारहून अधिक नागरिकांनी आपला सहभाग घेतला होता. 

महात्मा नगर क्रीडांगणावर झालेल्या या रनच्या उपक्रमास  व्यासपीठावर   नाशिक रन चे अध्यक्ष प्रबल रे, उपाध्यक्ष मुकुंद भट, सचिव अनिल दैठणकर, खजिनदार राजाराम कासार, नाशिक रन चे  विश्वस्त  श्रीकांत चव्हाण, अविनाश देशपांडे, रमेश शालिग्राम, तेजिंदरनाथ, अशोक पाटील,  जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  राजश्री गुंड,  माजी विश्वस्त एच एस बॅनर्जी, रमेश जीआर, सलील राजे, एच बी थोंटेश,  सुधीर येवलेकर,  बॉश इंडियाचे अध्यक्ष गुरुप्रसाद मुदलापूर, ख्रिटोप वर्सनेर , राकेश देसाई, एपीरॉक कंपनीचे महाव्यवस्थापक डॉक्टर कॅथरीना कोलकिंग, मनुष्यबळ विकास महाव्यवस्थापक पल्लवी पांडे, सोल्युशन चे जॉय अलुर, सुधीर मुतालिक, शशांक बेथारिया, थायसन कृप  चे  रवींद्र यादव, सॅमसोनाईट चे यशवंत सिंग,  बजाज संस चे सुमित बजाज,   एबीबी चे अतुल कुलकर्णी,मनोज वाघ,राहुल संगवी, वाय एम सिंग नागेश भट, अतुल मुंदडा,  आदि मान्यवर उपस्थित होते.

  नाशिक रन  हा लोकप्रिय उपक्रम सालावादाप्रमाणे यंदाही  महात्मा नगर क्रीडांगणावर  झाला.   सकाळी ८ वाजता  नाशिक रनचे उद्घाटन झाले व यावेळी राष्ट्रगीत संपन्न झाले. सकाळी.८.५५  वाजता प्रौढांसाठी रनला सुरुवात झाली. नाशिक रन महात्मा नगर क्रीडांगणापासून सुरू होऊन महात्मा नगर पाण्याची टाकी, रॉकेट सर्कल, जेहान सर्कल , गंगापूर रोड ,इंडियन ऑइल पेट्रोल पंप , परत जेहान  सर्कल, रॉकेट सर्कल भोसला गेट, सिक्स सिग्मा हॉस्पिटल व परत महानगर  क्रीडांगण असा नाशिक रन  झाला.विशेष मुलांसाठी व लहान मुलांसाठी रन  चा मार्ग टायटन वॉच महात्मा नगर पर्यंतच सीमित करण्यात आला होता.  रन मध्ये भाग घेणाऱ्या उपस्थितांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला  या लकी ड्रॉ बक्षीसामध्ये विजेत्यांना एलईडी टीव्ही, लॅपटॉप , सायकल , वाशिंग मशीन, घरगुती वापरासाठी चे हॅन्ड टूल्स व फर्निचर च्या वस्तू आदि बक्षीस देण्यात आले.  एक ते सात  क्रमांकाचे बक्षीसांचा लकी ड्रॉ यावेळी काढण्यात आल्यानंतर नाशिक टीडीके कंपनीकडून नाशिक रन चे  बॉश कंपनीकडे हस्तांतरण करण्यात आले.  हे हस्तांतरण विद्यमान अध्यक्ष प्रबळ रे यांनी नाशिक रन चे विद्यमान उपाध्यक्ष  मुकुंद भट यांना  केले. यानंतर उर्वरित उत्कंठा वाढीस लावणाऱ्या क्रमांक आठ ते दहा लकी ड्रॉ नंबर काढण्यात आले.  आभार नाशिक रनचे सचिव अनिल देठणकर यांनी मानले, सूत्रसंचलन स्नेहा ओक यांनी केले. कार्यक्रम यशस्वी ते साठी   नितीन देशमुख , बॉश कंपनीचे सुरक्षा व्यवस्थापक, सागर काजळे,श्रीपाद कुलकर्णी,  डॉ जॉर्ज शेरॉन ,  स्नेहा ओक, गोविंद बोरसे, उमेश ताजनपुरे, भूषण भुयारकर, अमित दराडे, सुधीर पाटील,  यांच्यासह वैद्यकीय सेवा, आदींसह २०० हून अधिक बॉश व टीडीके कंपनीचे स्वयंसेवक यशस्वीतेसाठी कार्यरत होते. 


चौकट 
२००३ साली नाशिक रनची मुहूर्तमेढ

सुरुवातीला २००३ साली नाशिक रन  या समाजसेवी संस्थेची मुहूर्तमेढ तत्कालीन संस्थापक विश्वस्त एन बालकृष्णन , सौमित्र भट्टाचार्य व समविचारी कंपन्यांचे मान्यवरांनी रोवली. नाशिक रन  या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत ५०० हून अधिक गरजू संस्थांना तसेच विशेषता क्रीडा संस्थांना व शैक्षणिक संस्थांना मदत करण्यात आली. हे सामाजिक कार्य आजतागायत अविरतपणे चालू आहे.